छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अंबादास आसाराम म्हस्के (वय ५५, रा. म्हस्के गल्ली) यांच्यावर महावीर चौक परिसरात चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. २४) मध्यरात्री घडली. मी मजाक करत होतो असे म्हणत गळाभेट घेत अंबादास यांना बेसावध केले आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राम शेषराव बोडखे (रा. टीव्ही सेंटर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत खंडू भीमराव म्हस्के (वय ३९) यांच्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री १० च्या सुमारास आरोपी राम बोडखे हा अंबादास म्हस्के यांना वारंवार फोन करत होता. फोनवर त्याने शिरसाठ यांचे नाव घेऊन शिवीगाळ केली,
तसेच हिंमत असेल तर बाबा पेट्रोल पंपावर भेटायला ये, असे आव्हान दिले. अंबादास यांनी याबाबत आपला पुतण्या खंडू याला कल्पना दिली. त्यानंतर दोघे एका वाहनाने (एमएच-२०, जीएम-७०७१) रात्री साडेअकराच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. महावीर चौकात आरोपी राम पूर्वीपासूनच थांबलेला होता. अंबादास म्हस्के त्याला भेटण्यासाठी पुढे गेले असता, रामने त्यांची गळाभेट घेतली. मात्र, म्हस्के बेसावध असल्याचे पाहून रामने चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला. म्हस्के यांच्या गळ्यातून
आरोपीचा पाय फॅक्चर
हल्ल्यानंतर जखमी अंबादास म्हस्के यांना शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, झटापटीत आरोपी राम बोडखे हा देखील जखमी झाला असून त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. त्याच्यावरही खासगी रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पुढील तपास क्रांती चौक पोलिस पुढील तपास करत आहेत.
मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. बाजूलाच उभे असलेले पुतणे खंडू यांनी आरोपी रामला धक्का देऊन बाजूला केले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions
















